सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

पर्याय...


कोणे एके काळी गरीब, साध्यासुध्या असलेल्या माझ्या देशाला आज दामटवत महासत्तेच्या शर्यतीत आणून उभ केलाय.

पूर्वीची पिढी हल्लीची पिढी यांच्या जगण्यात मला भयंकर तफावत जाणवते. हि तफावत नेमकी काय आहे कुठून आली 
हा प्रश्न मला बरेच दिवस सतावत होता.

माझ्या वडील clearing forwarding कंपनीत क्लार्क. चार आपत्ये पाच बहिणी. परिस्थिती बेताची. पण तरीही त्यांनी सर्व बहिणींची लग्न लाऊन मुलांचे शिक्षण करून झोपडीतून चाळीत चाळीतून इमारतीत आम्हाला आणले. मला आठवते माझ्या आई वडिलांची जीवन जगण्याची धडाडी फार प्रचंड होती. आहे त्यात आनंदी राहिले जे नाही त्याची कधी खंत केली नाही. म्हंटल्यास नोकरी क्लार्कची ती पण तीस वर्ष एकाच कंपनीत. पण गाडी कशी एकाच ट्रक वरून बिनबोभाट गेलीसांगायचं तात्पर्य हल्लीच्या पिढीकडे पैसा आला, ज्ञान आल सगळ काही आल पण जगण्याची रग म्हणून नाही. सगळे कसे सश्याचे काळीज असल्या सारखे जगतात

या सगळ्याचा उगम मला राजीव गांधीच्या काळात सापडतो. त्या काळी म्हंटल जायचं कि "राजीव गांधीने कॉम्पुटर आणला त्या मूळे आता देशात बेरोजगारी वाढेल"  राजीव गांधीने आर्थिक उदात्तीकार्नाची बीजे रोवली त्याची खरी सुरवात झाली ती नव्वदी च्या काळात नार्सिव्ह रावांच्या राज्यात.
साधारणतः दोन हजार सालापासून आपण त्याची फळे चाखायला किवा भोगायला सुरवात झाली

त्या आधी आयुष्य कस सरळ साध होत. मालक लोक नरीमन पोइन्ट, मलबार हिलला राहायचे. मनेजर मंडळी दादर, वांद्रे. जुहू मध्ये. पुढे सर्व चाकरमानी वर्गसगळ कस व्यवस्थित विभागलेल. समाजात कसल्याही प्रकारची सरमिसळ नाही. मध्यम वर्गातील आयुष्य कस व्यवस्थित sorted होत. पगार आला कि वाण्याच बिल चुकवायच. मूले जी काय असतील तीन चार ती जवळच्या मराठी शाळेत जायची. त्यात काही फॅड नाही मराठी कि इंग्रजी? .. icsc कि cbsc  ?. पाचवीत फी पाच रुपये सावित सहा रुपयेशाळाही सगळ्या सारख्याच थोडे फार उन्नीस बीस. पण उगाच शाळे साठी वणवण भटकणे icsc कि cbsc घेऊ? शाळेत काय काय activity आहे swimming, skating singing? भरमसाठ डोनेशन असले ताप नव्हतेसमाजात फार चढा ओढ नव्हती. सगळ्यांकडे बाजारात जायला काळी अट्लासची सायकल. विषय कसले तर .. मुलांची लग्न ...फडी वरील व्याज आणि गावाकडील शेती.

आर्थिक उद्दात्तीकरण आल आणि त्या बरोबर जीवनात आले खूप सारे पर्याय... आणि त्या बरोबर आले ते पर्याय निवडण्याचे त्रांगडे आणि ते पर्याय मिळवण्याची धडपड. आर्थिक उद्दात्तीकारणाने आपल्या देशाचे दार सर्वांसाठी खुले केल त्यातून देशविदेशीचे धंदे आले प्रोडक्ट आलेत. आली बींना पासपोर्ट इतर देशातील संस्कृती

"अंथरून पाहून पाय पसरावे" हे आपल्या व्याहावारिक जीवनाचे मुळ. बाहेरील कंपन्या आल्या सर्वप्रथम त्यांनी आपल्या याच गोष्टीवर घाला घातलासर्वप्रथम त्यांनी आणले क्रेडीट कार्ड, international  banks, ATM, मशीन्स. बाहेरील कंपन्यांना माहित होते कि आपण येथ धंदा आणू त्या मुले लोकांच्या शिष्यात पैसा खेळू लागेल पण तो पैसा खर्चायची सवय लोकांना लावणे गरजेचे आहे त्याशिवाय तो पैसा परत आपल्या देशात येणार नाही.

पूर्वी एखाद्या माणसावर कर्ज असणे हे लज्जास्पद मानले जायचे. पूर्वीही लोक शॉपिंग करायचे, नवीन घर विकत घ्यायचे पण कर्जात बुडून नाही. लोक क्रेडीट 
कार्ड वापरायला शिकले. कर्ज काढुन घर विकत घ्यायला शिकले. प्रत्येक गोष्ट हप्त्याहप्त्याने घेऊ लागले. पैसे जमून जेव्हा आपण एखादी गोष्ट विकत घेतो तेव्हा ती निश्चितच आपल्या ऐपतीप्रमाणे असते पण कर्ज काढुन घेतलेली गोष्ट भविष्यात आपल्याला पेलवेल कि नाही हे तर येणारा काळच सांगू शकतोखूप सारे पर्याय आले. maal आले..international brands आले. पूर्वी कसे कपडे धुवायचा साबण BB, निरमा, भांडे घासायचा  व्हील. अंग धुवायचा  lifeboy किव्हा फारतर LUX. खरेदी म्हणजे काय तर वर्षातून एखादवेळेस सणासुदीला कपडे, दागिने, घरासाठी भांडे, bedshit, पडदे. पण हळूहळू त्या खरेदीच रुपांतर झाल शॉपिंग मध्ये. दर रविवारी जोडपी AC  maal मध्ये  trollya घेऊन फिरू लागली. गरज नसतानाही सामान खरेदी करू लागली. magi, coke, चीज, हगीज  असले अनावश्यक पदार्थ शोप्पिंग चा भाग बनू लागली. " अहो आपल्याला dryfruits लागतात ना?" म्हणून उगाच रु ५०० चे dryfruits trolit टाकताना मी स्वतः पाहिले आहे.  

पूर्वी कसे घरात TV घ्यायचे म्हंटले कि ECTV  किव्हा CROWN TV घेतला  कि mission complete. पण आता कसं कलर टीव्ही घेतला कि LCD नाही घेता आल याच दुखLCD घेतला कि LED चा सोस. आणि त्यातही LG घेतला कि SONY घेता आला नाही याची खंत. आहे ते उपभोगण्या पेक्षा नाही ते मिळवण्याची धडपड सुरु झाली.

समाजात कशी सगळी सरमिसळ झालीये. पूर्वी कसे गाडी वैगरे घेण्याचा प्रश्नच पडत नसे. गाडी घ्यायचे काम नरीमन point, मलबार हिल वाल्या लोकांचे. गाडीपण कुठली premier padmini किव्हा  ambassador   बास. आणि उप्नागारतील लोकांच या सगळ्याशी काही संबध नाही. त्या गाड्यांचे शोरूम आपल्याला दिसतही नसे आपणास त्याच सोसहि पडत नसे.  Multinational  कंपन्या आल्या आणि रग्गड पैसा असलेल्या नोकऱ्या सुरु झाल्या. एकाच चाळीत एकत्र गोटया खेळलेले मित्र; एक IT कंपनीत मोठा पगार घेऊ लागला तर दुसरा फाक्टोरीत  झिजू लागला. उपनगरात कार आणि बेकार यांची गल्लत सुरु झाली.

पैसा आला पर्याय आलेत. पूर्वी कसे बूट म्हंटले कि बूट. आता त्या बुटांना नावे आलीत. Nike, Reebok, Adidas. चार हजारांचे बूट, पाच हजारंचे बूट पूर्वी एवढ्या पैश्यात घर चालायचेपैसा साठवायचे दोनच पर्याय FD  किव्हा  LIC. आता लोक Share मार्केट मध्ये डोके खपून स्वतःची झोप उडवू लागले. मग झोप लागावी म्हणून घरात AC लाऊ लागले. आणि वीजेच बिले पाहुन पुन्हा झोप गमावू लागले. पूर्वी बाहेर खायची चंगळ म्हंजे मामा काणे चा वडा, चौपाटीची भेल, फारच झाल तर उडपी हॉटेल मध्ये मसाला डोसा. आता काय तर Chinese, Italiano, thai, american burger, आणि त्यांची भरमसाठ बिले. खूप सारे चानेल्ल्स आलेत पण त्यात "चाळ नावाची वाचाळ वस्ती" सारख रमण नव्हत. फक्त चानेल बदलन आल.

वर वर पाहता या पर्यायानी आपले जीवन समृद्ध केले पण खरे पाहता या पर्यायानी आपल्याला उपभोक्त्या पासून चायन्कर्ता बनवले. सगळी कडे जीवनात सगळ काही मिळवण्याची एक रेस सुरु आहेmobile phone घेतला कि smart phone, iphone, ipad, list is never ending. पण 5 mega pixel पेक्षा 6 mega pixel कॅमेराने आपल्या जीवनात खरच काय फरक पडणार आहे हि सद्सद विवेक बुद्धी आज हरवलीये. जीवन समृद्ध बनण्या एवजी complicated  बनलय. साधपण गेल आणि पर्यायामागे धावणे आले

The race the has started, which has no turn back.....