शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४


Interstellar 2015 

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अखिल मानव जात नाश पावण्याच्या मार्गावर आहे. नासा एका महत्वाकांक्षी योजनेवर काम करत असते ज्यात काही साहसी अंतराळ वीरांना ते नवीन पृथ्वीच्या शोधा साठी अंतरिक्षात पाठवणार असतात. त्यासाठी ते काही अनुभवी अंतराळवीरांची निवड करतात. कुपर एक अनुभवी वैमानिक. आमेलिया एक जिज्ञासू खागोल्शास्त्राद्न्य. आणि भारतातून एक महान खगोल, गणित, आणि भौतिक शास्त्रद्न प्रो. मकरंद अनाजपुरे.
अनाजपुरे हे  ग्रामीण भागून आलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक. सोबत त्यांच्या त्यांनी खास अंतराळ प्रवासासाठी तयार केलेला रोबोट "नर्साळ्या".
अनाजपुरे आपल्या सोबत त्यांचे शास्त्रज्ञ गुरु अशोक सराफ यांना पण घेण्याची विनंती करतात पण प्रो. ब्रान्ड त्यास नम्र नकार देतात.

टीम दोन प्लान तयार करते. प्लान A नवीन राहण्याजोगा ग्रह शोधायचा आणि पृथ्वीवरील माणसांना तेथे हलवायचे.
प्लान B.   अनाजपुरे यांच्या सिद्धांता नुसार. जे काही पृत्थ्वीवर घडते त्या घटनेच्या प्रकाश व धव्नि लहरी अंतराळात जाऊन स्थिरावतात. आणि प्रत्येक काळाचा एक समय प्रतल तयार होतो. हिंदू धर्माचा रिती नुसार श्राध्द आणि त्यात उच्चारलेल्या मंत्र धव्नि लहरी त्या त्या समय प्रतलात जाउन त्या व्यक्तींना पुन्नर जीवित करते. त्या मुळे तो समय प्रतल फक्त पुनः प्रत्यय न राहता एक प्रती शृष्टी बनतो.

अनजपुरे यांच्या म्हणण्या नुसार हिंदू प्राचीन वैज्ञानिकांकडे(ऋषीमुनी) विश्वनिर्मित व विश्व लय या दोघांची उकल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शनि ग्रहाजवळ "वरवंटा" नावाचे वर्म होल आहे तेथून त्या प्रतलात शिरकाव केला जाऊ शकतो.  आणि त्यांच्याशी संपर्क साधून पृथ्वीच्या सध्यस्थिती बद्दल काही मार्ग शोधत येईल. अनाजपुरे आपल्या काही मागण्या प्रो. ब्रान्ड पुढे ठेवतात. १. यानात देवपूजेची एक स्वतंत्र खोली पाहिजे. २. अधून मधून त्यांच्या घरच्यांशी संपर्क झाला पाहिजे आणि ३. रोज सकाळी मटा ची digital कॉपी यानावर पोहोचली पाहिजे. प्रो. ब्रान्ड त्या नुसार सर्व व्यवस्था करतात आणि यान मानवजातीच्या उद्धारा साठी एका महान प्रवासाला सुरवात करते.

साडेतीन वर्ष प्रवास करून यान "वरवंट्या" जवळ पोहोचते "वरवट्यात" प्रवेश करून यान समय प्रतल जाळ्यात पोहोचते. एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर आपल्या मयत आजी आजोबांना भेटण्यासाठी यान त्या समय प्रतलात वळवण्याची विनंती करतात. पयलेट कुपर या गोष्टीवर आक्षेप घेतात. टीम मीटिंग होते. त्यात प्रोफेसर फार जोर देतात आणि भेट पटकन आवरण्याची हमी देतात, शेवटी काही काळासाठी यान वळवण्याचा निर्णय घेतला जातो. प्रोफेसरांची आजी आजोबांची भेट होते. भेट झाल्यावर यान पुढच्या प्रवासाला निघते.

दरम्यान साडेतीन वर्षाच्या प्रवास काळात आमेलिया आणि प्रोफेसारांमध्ये फारच जवळीक वाढते. प्रोफेसर तिला "पृथ्वी वाचेल तेव्हा वाचेल. पण मानवजातीच्या कल्याणासाठी आपण यानातच प्रजननाचे प्रयोग चालू करणे किती गरजेचे आहे" हे पटवून देतात. अर्थात कुपर चा  त्याचा आक्षेप असतो.

यान पुढील एका समय प्रतला जवळून जात असताना प्रोफेसर शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी यान वळवण्याची वीनंत करतात. यावर वैमानिक कुपर यांचा तोल ढळतो आणि दोघांमध्ये प्रचंड हाणामारी होते. आधी कुपर प्रोफेसरांना मारतात, मग प्रोफेसरांना कुपर मारतात मग पुन्हा कुपर प्रोफेसरांना मारतात. आमेलिया मध्ये पडून दोघांना सोडवते. एक टीम मीटिंग होते त्यात यान न थांबवता पुढे नेण्याचा निर्णय घेतला जातो.

शेवटी ते पुराण काळातील योजिलेल्या प्रतलात पोहोचतात. तिथे काय घडते? काय त्यांना पृथ्वी वाचवण्याचा मार्ग सापडतो? हि रंजक कथा आहे इंटर स्टेलर मध्ये. अवश्य पहा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा