मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

आर. के. लक्ष्मण तुम्ही गेलात त्याने काहीही फरक पडलेला नहिये.

आर. के. लक्ष्मण तुम्ही गेलात त्याने काहीही फरक पडलेला नहिये.
जनतेच्या शिव्या, कोर्टाचे  ताशेरे, भ्रष्टाचाराचे आरोप  यानेही ज्या राजकारण्यांच्या  गेंड्याच्या काताडीवरील सुरकुतीही हलत नाही, तिथे तुमच्या व्यंगचित्रांच काय घेऊन बसलाय?
आणि खर सांगायचं तर तुमच्या व्यंगचित्रात व्यंगच उरलेलं नव्हत. राजकारणी माणूस निवडून आल्यावर भ्रष्टाचार करतो यात कसलं आलाय व्यंग?
आणि त्याला निवडून देताना आम्हाला काय माहित नसत?, कि आज आपल्या जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या नावाने भाड्कावणारा, विरोधकांच्या नावाने बोंबा मारणारा हा माणूस उद्या निवडून आल्यावर काय करेल? आम्ही हे सगळ स्वीकारलाय, तुम्हाला उगाच त्यात काहीतरी व्यंग दिसत.

बर झालं तुमच्या व्यंगचित्राची जागा मोकळी झाली. आता तिथे एखाद्या बिल्डरने एखाद्या राजकारण्याला वाढदिवसा निमित्य "शतायुषी" होण्याची जाहिरात तरी देत येईल.…  आणि त्याच्या शेजारी एक बातमी असेल "कॉमन man च्या स्मारक उभारणीत भ्रष्टाचार". ते वाचून आम्ही निर्विकार पणे पान उलटू. आणि तीच असेल खरी तुम्हाला वाहिलेली प्रतीकात्मक शेवटची श्रद्धांजली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा